राज्य खो-खो स्पर्धेसाठी नाशिकचे संघ जाहीर Print

प्रतिनिधी , नाशिक
उस्मानाबाद येथे चार ते सात ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या महाराष्ट्र राज्य खो-खो अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी कुमार व मुलींचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाचा निरोप समारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार यांच्या उपस्थितीत झाला.
पंचवटीतील श्रीराम विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी तरुण ऐक्य मंडळाचे सचिव बाबुराव मुखेडकर, नितीन पवार, संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले उपस्थित होते. या संघास विजय शिंगे यांनी मार्गदर्शन केले. नाशिकच्या संघांना शिवायन प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच शासनाच्या क्रीडा धोरण समितीचे तज्ज्ञ सदस्य आ. नितीन भोसले यांनी पुरस्कृत केले आहे. कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांचे स्वागत उमेश आटवणे यांनी केले. प्रास्तविक सरचिटणीस मंदार देशमुख यांनी केले. निवड झालेल्या कुमार संघात मयूर जाधव (कर्णधार), सुशांत तरे, कपिल धवन, स्वप्निल चिकणे, विल्सन बिहारीलाल, रतन शर्मा, राकेश राजगुरू, विवेक शिनगर, वैभव आंबेकर, अक्षय खापरे, करण मोरे, राहुल बुटे, सागर कटारे (प्रशिक्षक), वैभव टिळे (व्यवस्थापक) तर मुलींच्या संघात वंदना चव्हाण (कर्णधार), ललिता चव्हाण, अनिता म्हसे, रेश्मा म्हसे, शर्मिला चौधरी, तनुजा गयाले, ज्योती गोसावी, अर्चना गाजरे, रोशनी कुयटे, अक्षदा म्हस्के, विभावरी लाड, ऐश्वर्या बर्डे, दीपक लभडे (प्रशिक्षक) यांचा समावेश आहे. मुख्य व्यवस्थापक म्हणून उमेश आटवणे काम पाहात आहेत.