वैश्यवाडा हनुमान मंदिरात सहस्र मोदक अर्पण सोहळा Print

वार्ताहर, सावंतवाडी
सुमारे ५२५२ मोदकांचा नैवेद्य आज संकष्टी चतुर्थीदिनी वैश्यवाडा हनुमान मंदिरात स्थानापन्न असलेल्या श्रींच्या चरणी अर्पण करण्यात आला. आज दुपारी महाआरतीनंतर हा ‘सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळा’ संपन्न झाला. तत्पूर्वी सकाळी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम झाला.
वैश्यवाडा येथील हनुमान मंदिरात २१ दिवस सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात सुरू आहे. त्यात रोज भजनादी कार्यक्रमांबरोबर आज हा सामुदायिक अथर्वशीर्ष पठण व सहस्र मोदक नैवेद्य अर्पण सोहळाही झाला. या वेळी वेद पाठशाळेचे प्राचार्य दीक्षित गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली अथर्वशीर्ष पठण झाले. या वेळी नितीन मुंज यांनी पूजा केली.
रोज होणाऱ्या भजनाच्या कार्यक्रमासाठी म्हापसेकर बंधू, धोंडी दळवी, अ‍ॅड्. परिमल नाईक, शरद सुकी, श्रीपाद पनवेलकर प्रकाश सुकी, बाळा राऊळ, प्रकाश निशाळ, महादेव गावडे, लघुरुद्र आनंद नेवगी व पंचखाद्य प्रसाद दादा केसरकर आदींचा सहभाग आहे.
९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ‘श्रीं’ची भव्य विसर्जन मिरवणूक निघणार असून, यात हलते देखावे, करमणुकीचे कार्यक्रम टी. व्ही. फेम कार्यक्रम आदींच्या सहभागात वाजतगाजत ही मिरवणूक निघणार आहे. या गणेशोत्सवात भाविकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन हनुमान मंदिर उत्सव समिती, वैश्यवाडा यांच्यातर्फे करण्यात आले आहे.