देशातील पहिल्या दहांमध्ये पुन्हा ‘ऑर्किड स्कूल’ Print

प्रतिनिधी, नाशिक
शैक्षणिकसह इतर पातळींवरील उपक्रम, क्रीडा शिक्षण, कार्यक्षम अध्यापन, अध्यापक कल्याण व विकास, पालकांचा सहभाग, शिस्त व जीवनकौशल्यावर आधारित शिक्षणप्रणाली, समाजसेवा, या निकषांच्या आधारे येथील ‘ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल’ची पुन्हा राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ‘सी-फोर एज्युकेशन वर्ल्ड सव्रे’च्या सर्वेक्षणानुसार देशातील पहिल्या दहा बोर्डिग स्कूलमध्ये ऑर्किडचा समावेश करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
शहरापासून १८ किलोमीटर व त्र्यंबकेश्वरजवळील ११० एकर क्षेत्रात ही शैक्षणिक संस्था वसली आहे. संस्थेस शासनाची अनेक मानांकने प्राप्त झाली आहेत. संस्थेच्या पूर्वप्राथमिक विभागातील मुलांची प्रगती व विकास व्हावा या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. खेळ आणि शैक्षणिक उपक्रम यांची सांगड घालून शिक्षणास चालना व दिशा दिली जात आहे. संगीत, नृत्य, कला, हस्तकला व इतर सह-शैक्षणिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा विद्यार्थ्यांना वर्गातच वैशिष्टय़पूर्ण पद्धतीने शिकविण्यावर अधिक भर दिला जात आहे, असे संस्थेने म्हटले आहे.