विवाहितेची मुलासह आत्महत्या Print

प्रतिनिधी, औरंगाबाद
तालुक्यातील करमाडजवळील कारोळ येथे राहणाऱ्या विवाहितेने दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रुक्मीणबाई रामनाथ खलसे (वय २५) व पवन खलसे (वय दीड) अशी मृतांची नावे आहेत.

गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास कारोळ गावातील विहिरीमध्ये मृतदेह तरंगत असल्याचे वृत्त कोतवाल हिरामण विश्राम अंबिलढगे यांनी करमाड येथील पोलिसांना कळविले. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पोलीस उपनिरीक्षक धारावे तपास करत आहेत.