येवल्याजवळ अपघातात एक ठार Print

येवला
शहरातील विंचूर चौफुलीवर गुरुवारी दुपारी ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मनमाडकडून कोपरगावकडे जाणारा ट्रक हा चौफुलीवर आला असता चौफुलीकडे पायी जाणारे संजय शंकर व्यवहारे (४५) हे ट्रकच्या मागील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी ट्रकचालक ईश्वरन् पाडियाली (२४, तामिळनाडू) यास कोपरगाव टोलनाक्याजवळ मनसे शहराध्यक्ष गौरव कांबळे यांच्यासह इतर युवकांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.