पोलिसाला महिलांकडून चोप Print

प्रतिनिधी, औरंगाबाद
विवाहित महिलेशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास वैजापूर येथे महिलांनी बदडून काढले. शुक्रवारी सकाळी पोलीस कर्मचारी वसाहतीत ही घटना घडली. दीपेश चंदेल असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. वैजापूर पोलीस ठाण्यासमोरील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत दीपशेने एका विवाहितेची छेड काढली. ही बाब त्या महिलेने इतरांना सांगितली. वसाहतीतील सर्व महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी हवालदारास बदडून काढले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अर्चना पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.