प्रभाकर पवार यांचे निधन Print

प्रतिनिधी , नाशिक
मालेगाव येथील वीज वितरण कंपनीतील निवृत्त कर्मचारी प्रभाकर मल्हारराव पवार (६२) यांचे शुक्रवारी आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, पाच भाऊ असा परिवार आहे. दै. ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. यकृताच्या विकाराने ग्रस्त असलेल्या पवार यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी मालेगावकडे नेण्यात येत असताना त्यांचे निधन झाले. संगमेश्वर भागात वास्तव्यास असणाऱ्या पवार यांचा मालेगाव शहरातील अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग होता. शुक्रवारी सायंकाळी मालेगाव येथे पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.