अण्णांनी केली केजरीवालांची पाठराखण Print

वार्ताहर
पारनेर
वढेरा यांनी तीन वर्षांत तीनशे कोटींची मालमत्ता जमविल्याच्या अरविंद केजरीवाल यांच्या आरोपानंतर निर्माण झालेल्या वादात आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही उडी घेतली आह़े  केजरीवाल यांचे आरोप खोटे असतील तर त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा का दाखल करीत नाहीत असा सवाल करून या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणीही हजारे यांनी  केली. वढेरा यांच्या या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून उपयोग नाही, असे स्पष्ट करून हजारे म्हणाले, सीबीआयवर केंद्र सरकारचे नियंत्रण असल्याने सीबीआयच्या चौकशीत सरकारचा दबाव येऊ शकतो. तसे झाले तर या प्रकरणातील सत्य बाहेर येणार नाही. सोनिया गांधी, वढेरा हे आरोप फेटाळत असतील तर त्यांनी केजरीवाल यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा.