आश्रमशाळेतील विद्यार्थिनीवर बलात्कार Print

वार्ताहर
वाडा
मोखाडा तालुक्यातील कोरगांव या शासकीय आश्रमशाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर त्याच शाळेत शिकणाऱ्या आठव्या इयत्तेतील एका विद्यार्थ्यांने बलात्कार केल्याची घटना गुरूवारी घडली आहे.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील येलेची मेट या गावात हे दोन्ही विद्यार्थी राहतात. गणपतीच्या सुट्टीनंतर बरेच दिवस गैरहजर राहून गुरूवारी आश्रमशाळेत परतत असताना वाटेत हा प्रकार घडल्याची माहिती मुख्याध्यापक एस.एल. पवार यांनी दिली. विद्यार्थ्यांचे नाव मनोहर जाधव असून तो फरार आहे. याप्रकरणी विद्यार्थिनीच्या पालकांनी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.