खिचडीतून ७० विद्यार्थ्यांना विषबाधा Print

बुलढाणा / प्रतिनिधी
खामगाव तालुक्यातील कुंबेफळ येथील मराठी पूर्व माध्यमिक शाळेतील ७० विद्यार्थ्यांना मंगळवारी दुपारी खिचडीतून विषबाधा झाली. यातील ३५ विद्यार्थ्यांना पिंपळगाव राजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांना खामगाव येथे आणण्यात येत आहे.  दरम्यान, शाळा समितीचे अध्यक्ष संतोष डांगे व प्रमोद कोंडे यांनी खिचडीचा नमुना घेऊन पंचायत समिती कार्यालय गाठले.   विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी करण्यासाठी गटविकास अधिकारी प्रकाश वाघ, जि.प. सदस्य सुरेश तोमर व प्रभारी गटशिक्षणाधिकारी गायकवाड कुंबेफळला रवाना झाले.  विषबाधा झालेले विद्यार्थी वर्ग १ ते ७ मधील आहेत.   दुपारच्या सुटीत विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यानंतर अध्र्या तासाने त्यांना मळमळ होऊन ओकाऱ्या सुरू झाल्या.