अशोक पाडावे पुन्हा एकदा सचिवालय जिमखान्याचे सदस्य Print

सावंतवाडी
मालवण तालुक्यातील आचरा गावचे सुपुत्र अशोक पाडावे यांची पुन्हा एकदा सचिवालय जिमखाना सदस्यपदी निवड झाली आहे. गतवेळच्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवून ५ वर्षे मुंबई मंत्रालयाच्या सचिवालय जिमखान्याचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचे स्वीय सहाय्यक म्हणून ते मंत्रालयात कार्यरत आहेत. द आचरा पीपल्य असोसिएशनचे सहसचिव, यश कल्चरल फौंडेशन ऐरोली, नवी मुंबई या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आदी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्व करीत आहेत.