शाहरूख खानच्या कोलकाता नाईट राईडर्सच्य़ा चिअरगर्लला वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक Print

alt

पुणे, १८ आँक्टोबर २०१२
अभिनेता शाहरूख खानच्या मालकीच्या कोलकाता नाईट राईडर्स या 'आयपीएल' संघाच्या २२वर्षीय चिअरगर्लला वेश्याव्यवसाय प्रकरणी बुधवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली.  कोरेगाव पार्क परिसरातील एका हाँटेलवर छापा टाकून तिच्यासह सिमा भगवान जगताप (३४) या एजंटलाही अटक करण्यात आली आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस अधिकारी भानुप्रताप बारगे यांनी सापळा रचून जगतापशी एक बनावट ग्राहक म्हणून संपर्क साधला. दिड लाख रूपये दिल्यास मॉडेल आणि चिअरगर्ल म्हणून काम करणारी मुलगी पुरवली जाईल असं आश्वासन बारगे यांना सिमा जगताप हिच्यातर्फे देण्यात आलं.  वेश्याव्यवसायची बनावट ग्राहकाला खात्री झाल्यावर पोलिसांनी संबंधीत ठिकाणी छापा मारून चिअरगर्लसह जगताप यांनाही अटक केली. दोघींनाही ट्रॅफिकींग अॅक्टच्या वेगवेगळ्या कलमांखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चिअरगर्ल मूळची नागपूरची असून सध्या ती मुंबईत वास्तव्याला आहे.
ती दोन दिवसांपूर्वी आपली आई आणि दोन मैत्रिणींसोबत पुण्यात आली होती. तिने जगताप हिच्याशी संपर्क सांधून कोरेगाव पार्क येथील हाँटेलमध्ये ग्राहकाला पाठवण्यास सांगितले होते.