नॅशनल प्रीमियर बुद्धिबळ स्पर्धेत विदित गुजराथी उपविजेता Print

प्रतिनिधी, नाशिक
कोलकाता येथे आयोजित ‘नॅशनल प्रीमियर’ बुद्धिबळ स्पर्धेत येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू विदित गुजराथीने सलग चौथ्या वर्षी यश मिळविले असून त्याची भारताच्या वरिष्ठ संघात निवड झाली आहे. कोलकात्याच्या इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतील प्रथम सहा खेळाडूंचा समावेश भारतीय वरिष्ठ संघात केला जातो. स्पर्धेत १३ ग्रॅण्डमास्टर, १३ आंतरराष्ट्रीय मास्टर, एक महिला ग्रॅण्डमास्टर, याप्रमाणे निवडक ४४ खेळाडूंचा समावेश होता. एकूण १३ सामन्यांपैकी विदितने चार सामने जिंकले, तर नऊ सामने अनिर्णीत राहिले. ८.५ गुण मिळवत त्याने दुसरा क्रमांक पटकाविल्याने त्याची भारतीय संघात आपोआपच निवड झाली.