डेंग्यूची साथ असूनही पालिका प्रशासन ढिम्म Print

आ. नितीन भोसले यांचा आरोप
प्रतिनिधी , नाशिक
जिल्ह्यात यंदा सप्टेंबपर्यंत डेंग्यूमुळे दहा जणांचा तर हिवतापाने एकाचा बळी गेला असून रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिका कार्यक्षेत्रात त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आ. नितीन भोसले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. डासांचा उपद्रव वाढत असताना पालिका कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
गेल्या वर्षी डेंग्यूमुळे जिल्ह्यात एक बळी सप्टेंबपर्यंत गेला होता. तीच संख्या यंदा दहावर गेली आहे. गेल्या वर्षी या डेंग्यूची साथ असूनही पालिका प्रशासन ढिम्म
 लागण झालेल्यांची संख्या केवळ एक होती. ती या वर्षी १०९ वर पोहोचल्याचे आ. भोसले यांनी म्हटले आहे. हिवतापाची स्थिती काहीशी वेगळी आहे. गतवर्षी हिवतापाचे ३१६१ रुग्ण आढळले असले तरी यंदा ही संख्या २०४१ इतकी आहे. महापालिका कार्यक्षेत्रात उघडे नाले, गटारी यांची नियमित साफसफाई होत नाही. स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असून जे आहेत तेही वेगवेगळ्या कारणास्तव गैरहजर राहतात. उघडय़ा जमिनींवर मोठय़ा प्रमाणात गवत वाढले असून त्यांना नोटीसही बजावली जात नाही. डेंग्यूच्या साथीमुळे संपूर्ण राज्यात सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले गेले असताना पालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म असल्याचा आरोपही त्यांनी केला. डेंग्यूबरोबर हिवताप, चिकुनगुनीया आदी आजारांनी शहरात थैमान मांडले असून पालिकेकडून धूर फवारणी व स्वच्छतेविषयी कोणतीही ठोस उपाययोजना किंवा जनजागृती केली जात नाही. या संदर्भात आवश्यक ते प्रतिबंधात्मक उपाय तातडीने योजावेत, अशी मागणी आ. भोसले यांनी केली आहे.