रायगड जिल्हा व्यावसायिक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा कर्जतला! Print

अलिबाग
रायगड जिल्हा व्यावसायिक अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा २८ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन पटांगण, कर्जत येथे आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे कर्जत तालुका कबड्डी असोसिएशन व जय मल्हार मित्रमंडळ, कर्जत यांच्या संयोजनाखाली ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्य़ातील व्यावसायिक संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी कर्जतकरांना मिळणार आहे.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जे. जे. पाटील, मुख्याध्यापक माध्यमिक शाळा शिहू ९८२२४२७१०२, जनार्दन पाटील, इंग्रजी माध्यमिक शाळा पेझारी ९२७०९२६४३६, गजानन मोकल कारावी, तालुका-पेण ९६७३१२८३४४, काशिनाथ शिंदे, हलिवली-कर्जत ९८६७२१५१७५ यांच्याशी संपर्क साधावा.कर्जत पोलीस ठाण्याच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेची जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धेसाठी उत्तम प्रकारची क्रीडांगणे तयार केली जात आहेत.