नाशिक विभागीय मुलींच्या ज्युदो स्पर्धेत धुळ्याचे वर्चस्व Print

प्रतिनिधी,नाशिक
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित शालेय मुलींच्या विभागीय ज्युदो स्पर्धेत धुळे जिल्ह्याने वर्चस्व मिळविले. स्पर्धेचे उद्घाटन हंप्राठा महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. एस. जाधव यांच्या हस्ते झाले. या वेळी नाशिक जिल्हा ज्युदो संघटनेचे सचिव रत्नाकर पटवर्धन, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, ज्युदो क्रीडा मार्गदर्शक विजय पाटील, योगेश शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धेतील १९ वर्षांखालील गटात ३६ किलोमध्ये किरण पाटील, ४० किलो काजल पाटील, ४४ किलो सुवर्णा पाटील, ४८ किलो करिश्मा माळी, या धुळ्याच्या मुलींनी विजय मिळविले. ५२ किलो गटात प्रतीक्षा शिंदे (नाशिक शहर), ५६ किलो स्विटी गवळी (धुळे शहर), ६१ किलो पूनम कोतवाल (नाशिक ग्रामीण), ६१ किलोपुढील गटात वैष्णवी मोटकरी (नाशिक शहर) हे विजयी झाले. १७ आणि १४ वर्षांखालील गटातही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत नाशिक, धुळे, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतील शहर व ग्रामीण विभागातील सुमारे १२५ स्पर्धकांनी सहभाग घेतला.