नाशिकमध्ये पंडित अजय पोहनकर यांचे आज शास्त्रीय गायन Print

प्रतिनिधी, नाशिक
येथील क. का. वाघ शिक्षण संस्थेतर्फे शनिवारी गंगापूर रोड परिसरातील शंकराचार्य सभागृहात सायंकाळी सहा वाजता किराणा व पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित अजय पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.
पं. पोहनकर हे संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर येथे झालेल्या संगीत संमेलनात पं. पोहनकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. संगीत शिक्षणात व इंग्रजी साहित्यात एम. ए. केलेल्या पंडितजींनी मुंबई विद्यापीठात काही काळ संगीत प्राध्यापक म्हणूनही काम केले. पं. पोहनकर यांच्या शास्त्रीय गायन कार्यक्रमाची मेजवानी नाशिककरांसाठी विनामूल्य ठेवण्यात आली असून रसिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.