‘चिनी गुलाब’चे आज प्रकाशन Print

प्रतिनिधी
नाशिक
मैथिली गोखले लिखित ‘चिनी गुलाब’ या लघु कादंबरीचे प्रकाशन रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता शहरातील कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रजनीताई लिमये, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शिरीष सुळे उपस्थित राहणार आहेत. गंगापूर रस्त्यावरील कुसुमाग्रज स्मारकात हा सोहळा होईल. याप्रसंगी नृत्यविशारद नकुल घाणेकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. शब्दश्री प्रकाशनने ही लघु कादंबरी प्रकाशित केली आहे. नागरिकांनी प्रकाशन सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीराम गोखले, अंकुश व तपस्या गोखले आदींनी केले आहे.