महेंद्र घरत इंटकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर Print

प्रतिनिधी
पनवेल
ज्येष्ठ कामगार नेते महेंद्र घरत यांची ‘इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस’ अर्थात इंटकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली आहे. घरत यांनी कामगार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कामगिरीची दखल घेत इंटकचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार संजीवा रेड्डी यांनी त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सरचिटणीसपदी निवड केली.  गेली २५ वर्षे हजारो कामगारांना न्याय मिळवून देणाऱ्या घरत यांनी असंघटित कामगारांनाही किमान सोयीसुविधा मिळवून दिल्या आहेत. अनेक कंपन्यांच्या व्यवस्थापनांशी संघर्ष करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्यास त्यांनी या कंपन्यांना वेळोवेळी भाग पाडले. इंटकच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी, त्यानंतर प्रदेश इंटकच्या सरचिटणीसपदी काम करणाऱ्या घरत यांची इंटकच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर आदी नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.