शेगावात दुकानांसह वाहनांची तोडफ ोड; दगडफेक, लाठीमार Print

प्रतिनिधी, बुलढाणा
फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र अपलोड केल्यावरून सोमवारी शेगावात दंगल उसळली. विशिष्ट समाजाच्या ३०० लोकांनी पोलीस ठाण्यापासूनच दुकाने व वाहनांची तोडफोड करून दगडफे कही केली. या घटनेला कारणीभूत असलेल्या आरोपीला अटक करण्याची मागणी रेटून धरली. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी निरपराध लोकांवर लाठीमार केला. दंगल भडकताच व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने तातडीने बंद केली. सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून, कडक पोलीस बंदोबस्त आहे.
शेगावातील अमर काशेलानी याने फेसबुकवर विशिष्ट समाजाच्या भावना दुखावतील, असे आक्षेपार्ह चित्र अपलोड केल्याचा आरोप करीत तीनशे लोकांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. यावेळी प्रचंड तणाव निर्माण झाला. चित्र अपलोड करणाऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर गोंधळ घालण्यात आला. दरम्यान, काशेलानी याला पोलिसांनी अटक केल्यावर पोलीस ठाण्याच्या आवारात पोलिसांची गाडी अडवण्यात आली. पोलीस कारवाईला उशिर करत असल्याने संतप्त जमावाने दगडफेक करून तोडफ ोडीला सुरुवात केली. दुकानांसमोरील वाहनांची तोडफ ोड करण्यात आली. शिवाजी चौकात काशेलानी याच्या दुकानाचीही तोडफ ोड करण्यात आली, तसेच चौकातील ट्राफीक बुथही तोडण्यात आला. शहरात दंगल उसळताच नागरिक जिवाच्या आकांताने सैरावैरा पळू लागले. घटनेची माहिती समजताच तातडीने पोलिसांचा ताफा दाखल झाला. दंगाकाबू पथकही पोहोचले. यावेळी पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार सुरू केला. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला. संतनगरीच्या शांततेला पहिल्यांदाच या घटनेने गालबोट लागले. पोलीस ठाण्यासमोरील जमावावर पोलिसांनी आधीच नियंत्रण मिळवले असते तर ही घटना घडली नसती, असे बोलले जात आहे.