कोकण रेल्वेची डॉक्युमेंटरी भारतीय रेल्वे बोर्डाला सादर करणार Print

वार्ताहर, सावंतवाडी
कोकण रेल्वेची डॉक्युमेंटरी बनवून भारत सरकारच्या रेल्वे बोर्डाला इंग्लंडची टीव्ही ५ ही टीम सादर करणार आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांत कोकण रेल्वे प्रवासात आमूलाग्र बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या डॉक्युमेंटरीसाठी कोकण रेल्वेचे तत्कालीन निवृत्त सर्वेसर्वा बी. राजाराम यांनी पेडणे येथे उपस्थिती दर्शविली.
कोकण रेल्वेच्या डॉक्युमेंटरीमुळे एक्स्ट्रीम या इंग्लंडच्या टीव्ही ५ या टीमने आज कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे निवृत्त बी. राजाराम यांच्यासह राज्यराणी एक्स्प्रेसमधून सावंतवाडी रोड स्थानक गाठले. त्यानंतर टीमने पेडणे येथे रस्त्याने प्रवास केला.
कोकण रेल्वेचे स्वप्न सत्यात साकारले असले तरी ऋतुमानानुसार कोकण रेल्वेचा वेग कमी होत आहे. ऊन, वारा, पावसाला तोंड देत वेळीच रेल्वे धावल्यास पुष्कळ वाया जाणारा वेळ वाचेल असे अपेक्षित आहे.
इंग्लंडच्या टीव्ही ५ या चॅनलच्या टीमने कोकण रेल्वेची डॉक्युमेंटरी मुख्य अभियंता बी. राजाराम यांच्या समवेत बनविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही टीम कमीत कमी पाच वर्षांत कोकण रेल्वेच्या प्रवासात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी डॉक्युमेंटरी भारतीय रेल्वे बोर्डाला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. कोकण रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण शूटिंग स्वरूपात डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून बनविले जात आहे. त्यासाठी इंग्लंडमधील पॅट्रिक यांच्यासह एक टीम या ठिकाणी दाखल झाली. त्यांनी रेल्वे प्रवासाचे शूटिंग केले आहे.