‘शिवसत्य’चा टेबल टेनिस संघ राज्यस्तरासाठी पात्र Print

प्रतिनिधी,  नाशिक
शहरातील गंगापूर रोड येथील शिवसत्य क्रीडा मंडळात सराव करणाऱ्या महिला टेबल टेनिस संघाची पुण्यातील बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी पात्र ठरला आहे.९ ते १२ नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विभागीय स्पर्धेत उपान्त्य फेरीत धुळ्यावर ३-२ ने मात केली. अंतिम सामन्यात नंदुरबारच्या संघावर ३-० अशी मात केली. अनुजा निंबाळकर, श्वेता कुलकर्णी, श्रेया मुत्तुकुमार, दीपा भुजबळ हे खेळाडू प्रशिक्षक शशांक वझे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मंडळात सराव करत आहेत.