सिंधुदुर्गात पावसाचा शिडकावा Print

वार्ताहर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आज अनेक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. आज दिवसभर आकाशात पावसाळी वातावरणासारखी स्थिती असल्याने बागायतदार धास्तावले. आज तिन्ही ऋतूंचा अनुभव लोकांनी थोडाफार फरकाने घेतला.
थंडीसोबतच दिवसभर पावसाळी वातावरण व अधूनमधून सूर्याचे दर्शन झाले. दिवसभर पावसाळी वातावरण होते. भातशेतीची कापणी व बागायतदारांसाठी थंडीची लाट येत असतानाच ऋतुमान बदलले.