नाशिकमध्ये आजपासून २३ वी राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धा Print

प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या वतीने पंचवटीतील नवरंग मंगल कार्यालयात शुक्रवारी २३व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन आ. माणिकराव कोकाटे, क. का. वाघ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष काशिनाथ टर्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या स्पर्धेत ८४० खेळाडू, पंच व इतर पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा सहभाग या स्पर्धेत राहणार आहे. या प्रसंगी नाफेडचे अध्यक्ष चांगदेव होळकर, क्रीडा व युवक सेवा नाशिक विभागाचे उपसंचालक जगन्नाथ आधाने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुधीर मोरे, कालिका संस्थानचे अण्णासाहेब पाटील, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रकाश काटोळे, खजिनदार पांडुरंग रणमाळ, संजय चव्हाण, जिल्हा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र मोरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते या वेळी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे जिल्ह्य़ातील क्रीडा शिक्षक प्रशांत भाबड, निर्मला चौधरी, कैलास लवांड, सोपान वाटपाडे, नवनाथ निकम, बाळासाहेब रणशूर, दिनेश अहिरे, शंकर आहेर, कीर्ती गायकवाड, मनोज कनोजिया यांचा सत्कार करण्यात येणार आहे.