कोकणात कुष्ठरोगी सापडण्याचे प्रमाण वाढले Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी
देशात कुष्ठरोगाचे निर्मूलन झाल्याचा दावा काही जण करत असले तरी कोकणात कुष्ठरोगी सापडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी विशेष शोधमोहीम राबवत आहेत. गेल्या २ ते १२ ऑक्टोबर या काळात रत्नागिरी जिल्'ाातील संगमेश्वर, खेड व मंडणगड या तीन तालुक्यांमध्ये कुष्ठरोगी शोधमोहीम घेतली असता १९ नवीन रुग्ण निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे गेल्या एप्रिलपासून सप्टेंबरअखेपर्यंत जिल्'ाात ५७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, शासनाच्या आरोग्य विभागातर्फे दूरीकरण (एलिमिनेशन)आणि निर्मूलन (इरॅडिकेशन) या दोन पातळ्यांवर कुष्ठरोगविरोधी मोहीम राबवण्यात येते. त्या दृष्टीने रत्नागिरी जिल्'ाात नवीन कुष्ठरोगी सापडण्याचे प्रमाण किंचित वाढले आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षांत संपूर्ण जिल्'ाात एकूण १६४ नवीन रुग्ण सापडले होते. यंदाच्या वर्षांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तीन तालुक्यांतील शोधमोहिमेचा अनुभव जमेस धरून उरलेल्या सहा तालुक्यांमध्ये येत्या डिसेंबरात ही मोहीम राबवण्यात येणार आहे. शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्'ाात २०१०-११ या आर्थिक वर्षांत एकूण ९२ नवीन रुग्ण निष्पन्न झाले होते. यंदाच्या वर्षी पहिल्या सहा महिन्यातच या जिलात ७० नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्'ाांमध्ये कुष्ठरोग दूरीकरणासाठी आणखी जोमाने प्रयत्न करावे लागणार आहेत.  अर्थात या दोन जिलांच्या तुलनेत ठाणे व रायगड जिल्'ाात कुष्ठरोगी आढळून येण्याचे प्रमाण कितीतरी जास्त असून २०१०-११ या वर्षांत ठाणे जिल्'ाात २४७८, तर रायगड जिल्'ाात १०६६ कुष्ठरुग्णांची नोंद झाली आहे, अशी माहिती डॉ. आठल्ये यांनी दिली.