भारतीय वंशाच्या डॉ. वेंकटेश राघवन यांना ‘२०१२ सोल कट्झ अ‍ॅवॉर्ड’ Print

प्रतिनिधी, पुणे
भारतीय वंशाच्या डॉ. वेंकटेश राघवन यांना ‘२०१२ सोल कट्झ अ‍ॅवॉर्ड’ देण्यात आले असून हा पुरस्कार मिळवणारे ते आशियातील पहिले आहेत. ‘जिओस्पेशल फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर’च्या निर्मितीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
अमेरिकेतील ओएसजीओ फाऊंडेशन या सामाजिक संस्थेकडून हा पुरस्कार दिला जातो. जिओइन्फर्मेटिक्स या विषयावर हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या एका परिषदेमध्ये डॉ. राघवन यांना      हा पुरस्कार देण्यात आला.
 डॉ. राघवन यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे विद्यापीठातून झाले असून सध्या ते जपानमधील ‘ओसाका’ विद्यापीठाच्या ‘जिओइन्फर्मेटिक्स’ विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ आणि हैदराबाद येथील इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्याबरोबर सध्या संशोधन प्रकल्प करत आहेत.
जिऑग्राफिक इन्फर्मेशन सिस्टमद्वारे (जीआयएस) एखाद्या भूभागातील नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक परिस्थितीचे नकाशाच्या माध्यमातून व्यवस्थापन केले जाते. अशा प्रकारची सुविधा ‘जिओस्पेशल फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ च्या माध्यमातून डॉ. राघवन यांनी उपलब्ध करून दिली आहे. जिओइन्फर्मेटिक्स, जिओस्पेशल सव्‍‌र्हिस, वेब सेन्सर, रिमोट सेन्स्िंाग या विषयांवर डॉ. राघवन यांनी संशोधन केले आहे.