पुण्यातील जे.पी. ज्वेलर्सवर दरोडा Print

चोरांनी साडेसात कोटींचं सोनं लांबविले
पुणे, २ नोव्हेंबर २०१२
पुण्यातील रास्तापेठ भागातील जे.पी. ज्वेलर्सवर गुरूवारी मध्यरात्री चोरांनी दरोडा टाकून साडेसात कोटींचं सोनं लंपास केले आहे. सदर ज्वेलर्सचे मालक दुकानाच्या मागेचं राहत असून दरोडा गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पडला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

तसेच ह्या दरोड्यात तीन ते चार चोरट्यांचा समावेश असून रात्री दुकानामागचे दार फोडून चोरांना दुकानात प्रवेश केला आणि साडेसात कोटींचे सोने लांबविल्याचे आज (शुक्रवार) सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर दुकान मालकाने पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. दुकानामध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे असल्याने चोरांचे छायाचित्रण झाले आहे आणि त्यानुसार तपास सुरू आहे.