आय.आर.बीच्या कार्यालयांवर केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाचे छापे Print

alt

पुणे, २ नोव्हेंबर २०१२
माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांच्या हत्ये प्रकरणी तपास करणा-या केंद्र गुन्हे अन्वेक्षण विभागाने आज(शुक्रवार) एकूण चार ठिकाणी छापे मारले आहेत. गेल्या आठवड्यात यासंबंधी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाने(सीबीआय) एकूण ११ छापे मारले होते. व्यावसायिक हित राखण्याच्या उद्देशातून सतिश शेट्टी यांची हत्या झाल्याचा आरोप आहे आणि त्यांची हत्या घडवून आणण्यामागे आयआरबीचा हात असल्याचा संशय आहे.
सतीश शेट्टी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात लोकशाहिवादी कार्यकर्त्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तसेच त्यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी झाली होती. जनतेने देखील हा मुद्दा उचलून धरल्याने राज्य शासनाने याची दखल घेत संबंधीत तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे.