महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पतीचीही नाशकात आत्महत्या Print

परभणी
वार्ताहर
पूर्णा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल चित्रा प्रशांत पाटील यांचा मृतदेह पोलीस वसाहतीतील घरात संशयास्पद अवस्थेत आढळून आला. चित्रा यांची हत्या की आत्महत्या हे अजून निष्पन्न झाले नसून, पोलिसांनी मात्र त्यांची हत्याच झाल्याचा संशय व्यक्त केला. दरम्यान, चित्रा पाटीलचे पती प्रशांत पाटील यांनीही शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास नाशिक येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे चित्राचा पतीनेच खून केला, यास पुष्टीच मिळत आहे.