सीडब्ल्यूसीमध्ये भरघोस पगारवाढ Print

प्रतिनिधी
पनवेल
कळंबोली येथील सीडब्ल्यूसी अकदास मेरिटाइम एजन्सी प्रा. लि. या कंपनीतील कामगारांना दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर भरघोस पगारवाढ मिळाली आहे. नवी मुंबई जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली नुकताच याबाबतचा करार करण्यात आला.  तीन वर्षांसाठी झालेल्या या करारांतर्गत या कंपनीतील कामगारांना दरमहा २७०० रुपये पगारवाढ, रजांच्या संख्येत वाढ, बोनस, वेतनचिठ्ठी, ईएसआयसी योजना व ग्रॅच्युएटी कायद्याची अंमलबजावणी आदी सुविधा मिळणार आहेत. या कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी माजी खासदार रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण व्यवस्थापनाशी गेले सहा महिने संघर्ष केला व हा करार अस्तित्वात आला, अशी प्रतिक्रिया महेंद्र घरत यांनी व्यक्त केली. या करारामुळे कामगार वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.