चांढवे गावाजवळ कॅन्टरला अपघात; दोन जखमी Print

महाड, २ नोव्हेंबर
मुंबई-गोवा महामार्गावर चांढवे गावाच्या हद्दीत आज पहाटे कॅन्टर वाहनाला झालेल्या अपघातामध्ये चालकासह दोन जण गंभीर जखमी झाले. महाड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. महाडपासून दहा किलोमीटर अंतरावर चांढवे गावाच्या हद्दीत मुंबईहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या कॅन्टर क्रमांक एमएच-०८/एपी-२०४० या मालवाहू ट्रकला समोरून येणाऱ्या लक्झरी बसने हुलकावणी दिल्यामुळे कॅन्टरचालकाचा वाहनावरील ताबा सुटला. कॅन्टरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जोराने धडक दिली. या अपघातामध्ये चालक संतोष विद्याधर मांजरेकर आणि सचिन विष्णू चव्हाण दोघेही राहणार रत्नागिरी जखमी झाले. त्यांच्यावर महाड येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी दोघांनाही रत्नागिरीला पाठविण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी दिली.