पंचवटीतून २७ तोळे सोने लंपास Print

प्रतिनिधी
नाशिक
पंचवटी येथून दुचाकीच्या डिकीतून अज्ञात चोरटय़ांनी गुरुवारी रात्री तब्बल २७ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोकार कॉलनीतील सराफ संजय बिरारी हे घरी जात असताना हा प्रकार घडला. गोदा घाटावरील पांडे मिठाईजवळ त्यांनी एका दुकानात काही वस्तू खरेदीसाठी आपली दुचाकी उभी केली होती. ते दुकानात गेले असताना अचानक अज्ञात चोरटय़ांनी गाडीच्या डिकीतून २७ तोळे सोने लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.