सिंधुदुर्गमध्ये ग्रामपंचायत निवडणूक २६ नोव्हेंबरला Print

वार्ताहर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात येत्या २६ नोव्हेंबरला ३२९ ग्रामपंचायतींची आचारसंहिताही जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे सप्टेंबरला होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. सिंधुदुर्गातील ३२९ ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर २०१२ रोजी संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे- निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक १ नोव्हेंबर. नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा कालावधी ७ ते १० नोव्हेंबर सकाळी ११ ते दुपारी ३ वा. नामनिर्देशन पत्राची छाननी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा., नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दि. १६ नोव्हेंबर सकाळी ११ वा. ते दुपारी ३ वा. निवडणूक चिन्ह देण्याचा तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचा दि. १६ नोव्हेंबर दुपारी ३ वा. मतदानाचा दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वा.पर्यंत, मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात आला आहे.  या निवडणुकीत २९ दिवसांची आचारसंहिता असून ३० जून २०१२ रोजीची मतदार यादी ग्राह्य़ धरली जाणार आहे. मतदान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होईल, तसेच निवडणुकीसाठी अन्य सर्व माहिती, दाखले आवश्यक आहेत.