वक्तृत्व स्पर्धेत धुळ्याच्या ‘जयहिंद’चे यश Print

वार्ताहर

 धुळे
‘सोशल मीडियामुळे आजची तरुण पिढी संस्कारहीन बनली आहे काय?’ या विषयावर मालेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित आंतर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धेत येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या जयहिंद हायस्कूलमधील ऋतुजा जवाहर पाटील व अश्विनी विजय साळुंखे या दोन्ही विद्यार्थिनींच्या संघाने पहिला क्रमांक मिळविला.
तीन हजार रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मालेगाव येथील आयएमए हॉलमध्ये घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत एकूण २७ संघ सहभागी झाले होते. सरला पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ऋतुजा व अश्विनी सध्या दहावीत शिकत आहेत.