एचपीटी महाविद्यालयात पत्रकारितेवर आज व्याख्यान Print

प्रतिनिधी, नाशिक
जिल्हा माहिती कार्यालय व एचपीटी महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे वृत्तपत्रविद्या पदवी अभ्यासक्रम केंद्र यांच्यातर्फे ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता ‘बाळशास्त्री जांभेकर व आजकालची पत्रकारिता’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार सुरेश अवधूत यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ राहणार आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षांनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एचपीटी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या व्याख्यानाचा वृत्तपत्रविद्या पदविका, पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी देवेंद्र पाटील व अभ्यास केंद्राचे समन्वयक श्रीकांत सोनवणे यांनी केले आहे.