काँग्रेस आय पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नवनीतराम मेहता कालवश Print

मुरुड, ४ नोव्हेंबर
मुरुड शहरातील प्रसिद्ध व्यापारी व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते नवनीतराम करसनदास मेहता यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांचे ते खंदे समर्थक होते. पक्षाच्या स्थापनेपासून ते सतत सक्रिय होते. त्यांच्या अंत्र्ययात्रेस बाजारपेठेतील प्रतिष्ठित तसेच अनेक पक्षीय कार्यकर्त्यांनी खूपच गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात मुलगा विपुल मेहता व मुलगी ममता मेहता, नातवंडे व त्यांची पत्नी असा परिवार आहे.