डहाणू नगर परिषदेसाठी ५५ टक्के मतदान Print

ठाणे, ४ नोव्हेंबर
डहाणू नगर परिषदेच्या २३ जागांसाठी आज शांततेत आणि सुरक्षितपणे ५३ ते ५५ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आज रविवारी झालेल्या मतदानासाठी दुपापर्यंत केवळ २५ टक्केच मतदान झाले. त्यानंतर दुपारनंतर सर्वच केंद्रांवर मतदारांची गर्दी होऊ लागल्याचे दिसून येत होते. अखेपर्यंत प्राथमिक अंदाजानुसार ५५ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत ६ प्रभागांतून २३ जागांसाठी १०० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज मतपेटीत त्यांचे भवितव्य बंद झाले. या निवडणुकीत एकूण ३७ हजार ३०८ मतदार आहेत. यापैकी फक्त ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. एकंदरीत आजचे मतदान निरुत्साहाच्या वातावरणात पार पडल्याचे चित्र दिसत आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या बडय़ा नेत्यांनी डहाणूत हजेरी लावली होती.