प्रवासी मिनिडोअर रिक्षाला जीपची धडक : सातजण जखमी Print

महाड,
महाडवरून पोलादपूरला जात असलेल्या मिनिडोअर रिक्षाला मागील बाजूने भरधाव वेगाने येत असलेल्या जीपने जोराने धडक दिल्यामुळे रिक्षातील सात प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. पोलादपरनजीक असलेल्या उंभरकोंड फटय़ाजवळ मिनिडोअर रिक्षाचा वेग कमी झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावरून भरधाव वेगाने जाणाऱ्या जीपने रिक्षाच्या मागील बाजूने जोराने धडक दिली. जीपची धडक एवढी जोराने बसली की रिक्षा रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्डय़ात कोसळली. या अपघातामध्ये रिक्षाचालकासह सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चालक मनोहर कवे (रा. देशमुख कांबळे, महाड), अनिरुद्ध पवार, श्रुती भागवत, स्वप्निल झेंडेकर, अनिकेत दरेकर, शर्मिला कसबे, अलका पवार (सर्व पोलादपूर) यांचा समावेश आहे. जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी पोलापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोदविण्यात आला.