नाशिकमध्ये बँक बचाव समितीचा आंदोलनाचा इशारा Print

प्रादेशिक
 नाशिक
नाशिक व पुणे येथील सहकार खात्याचे अधिकारी हे जाणीवपूर्वक बँक व पतसंस्था ठेवीदारांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे शहरातील खुटवडनगर येथे झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीतील चर्चेतून समोर आल्याने नाशिक व पुणे येथील सहकार कार्यालयांपुढे सात व नऊ नोव्हेंबर रोजी निदर्शने करण्याचा निर्णय नाशिक जिल्हा बँक ठेवीदार हितवर्धक तथा बचाव समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सात नोव्हेंबर रोजी सारडा सर्कलवरील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर तर नऊ नोव्हेंबर रोजी सिडकोतील बढेसर पतसंस्थेसमोर दुपारी दोन ते पाच या कालावधीत ठेवीदार निदर्शने करणार आहेत. दिवाळीनंतर पुणे येथील सहकार आयुक्तांच्या कार्यालयापुढे आंदोलन करून सहकार खात्याला व महाराष्ट्र शासनाला या प्रश्नांबाबत जाग आणण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या आंदोलनात अधिकाधिक पीडित ठेवीदारांनी सहभागी होण्याचे आवाहन बँक बचाव समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, उपाध्यक्ष अ‍ॅड. तानाजी जायभावे, बी. डी. घन, राजू देसले, पी. जी. आसोपा आदींनी केले आहे.