नाशिकमध्ये अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीररित्या जखमी Print

alt

नाशिक, ५ नोव्हेंबर २०१२
नाशिक काँलेज रोड परिसरातील एका माँलला लागलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीरित्या जखमी झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले. शो-रूमला रविवारी रात्री अचानक आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या ताबडतोब घटनास्थळी रवाना झाल्या आणि रात्री एका वाजता आगीवर नियंत्रण मिळवले, असे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिनेश लासुरे (३८) या अग्निशामक कर्मचा-याला शो-रूम मधल्या काचा लागल्याने गंभीररित्या दुखापत झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाँट-सर्कीटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज असून पुढील तपास सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिकचे महापौर यतीन वाघ आणि वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली.