स्वदेश फाऊंडेशनच्या दोन कार्यकर्त्यांची परदेश दौऱ्यासाठी निवड Print

प्रतिनिधी ,अलिबाग  
स्वदेश फांऊडेशनच्या दोन कार्यकर्त्यांची कौन्सिल ऑफ इंटरनॅशनल फेलोशिपच्या वतीने परदेश दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे. स्वदेश फाऊंडेशन गोरेगावमध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करणारे बाबासाहेब चव्हाण व सामाजिक कार्यकर्ते अमोल चौगुले, अशी या दोघांची नावे आहेत. १० नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान नेदरलॅण्ड येथील अभ्यास दौऱ्यात ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. नेदरलॅण्डमधील सामाजिक संस्थांना भेट देऊन ते सांस्कृतिक विचारांची देवाणघेवाण करणार आहेत. स्वदेश फाऊंडेशनच्या वतीने दोघांनाही शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.