नाशिकमधील गंगापूर धरणातून पाणी पुरवठा करण्याची शेतक-यांची मागणी Print

alt

नाशिक, ६ नोव्हेंबर २०१२
निफाड आणि नाशिक मधील हजारो शेतक-यांनी अपु-या पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून मोर्चा काढत गंगापूर कालव्यातून गोदावरी कालव्यात पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे . सध्या जिल्ह्यातील एकूण ६५ गावांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या अपु-या पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. 'उप-विभागीय अधिका-यांनी आज (मंगवार) पासून गंगापूर धरणातून पाणी सोडणार असल्याचे आश्वासन दिल्याने शेतक-यांनी काल (सोमवार) सुरू केलेले आंदोलन मागे घेतले आहे', असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.