काँग्रेस नेते शंकरराव काळे यांचे निधन Print

वार्ताहर, कोपरगाव
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार शंकरराव देवराम काळे (९२) यांचे  सोमवारी रात्री मुंबई येथील ब्रीच कँडी रूग्णालयात प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले.
त्यांच्या पार्थिवदेहावर  आज, बुधवारी माहेगाव देशमुख या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  
त्यांच्या निधनाने कोपरगाव रयत शिक्षण परिवार तसेच सहकार क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  आमदार अशोक काळे हे त्यांचे पुत्र आहेत.