‘चोसाका’चा आज अग्नी प्रदीपन सोहळा Print

चोपडा
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम बुधवारी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन सोसायटीचे कार्यकारी संचालक डॉ. सुकेश झंवर राहणार आहेत. अग्नी प्रदीपन कारखान्याच्या संचालिका इंदिरा पाटील व भानुदास पाटील, विजया पाटील व प्रभाकर पाटील या दाम्पत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी सभासद, ऊस उत्पादकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील, उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी यांनी केले आहे.