रावेर तालुक्यात एकाची हत्या; तीन जखमी Print

वार्ताहर
जळगाव
जिल्ह्य़ातील रावेर शहराजवळ कुसुंबा येथे हल्लेखोरांनी एका व्यक्तीचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराच्या पुजाऱ्यासह आणखी तिघे जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. भवानी मातेच्या मंदिरालगतच्या घरात ही घटना घडली. सोमवारी मध्यरात्री तोंडावर कपडा बांधलेल्या काही हल्लेखोरांनी सुधाकर कापडे (५५) यांची लोखंडी हातोडा व सळ्यांचे वार करून हत्या केली. हल्लेखोरांनी मंदिराचे पुजारी संतोष पवार (५२), त्यांची पत्नी संत्रीबाई व इतर एका व्यक्तीवरही हल्ला केला. पुजाऱ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. हल्लेखोरांनी मंदिरात चोरी केलेली नाही. घरातूनही कोणतीच वस्तू, दागिने चोरीस गेलेले नाहीत. त्यामुळे या हल्ल्याचे निश्चित कारण काय, हे निष्पन्न झालेले नाही. घटनेची फिर्याद जखमी संत्रीबाई यांनीच स्वत: दिली. मयत सुधाकर कापडे हे जवळच्या रसलपूर येथील रहिवासी आहेत.