डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व Print

ठाणे,
डहाणू नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसने २३ जागांपैकी १५ जागांवर विजय मिळवून बहुमत संपादन करून सत्ता संपादित करण्यात यश मिळविले आहे.
डहाणू नगरपरिषदेच्या ६ प्रभागांतून झालेल्या २३ जागांसाठी रविवारी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज सकाळी १० वाजल्यापासून कम्युनिटी हॉलमध्ये सुरू करण्यात आली. मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक १५ जागांवर विजय मिळाला. काँग्रेस (आय) पक्षाला ५ जागा मिळवून समाधान मानावे लागले. शिवसेनेला २ जागांवर समाधान मानून मागच्या वेळेच्या जागा कायम ठेवण्यात यश आले. भाजपने १ जागा जिंकून आपले गतवैभव परत मिळवले आहे, तर मागच्या वेळी डहाणूतील मतदारांनी झिडकारलेल्या बहुजन विकास आघाडीला या वेळीही एक जागा मिळविता आली नाही आणि भाकपलादेखील एकही जागा जिंकता आली नाही. डहाणू नगरपरिषदेची या वेळी निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या ठिकाणी सत्ता संपादित करण्यासाठी राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले होते. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राजेश पारेख यांचा काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार शेख सईद अब्दुल रशीद याने त्यांचा अवघ्या ९ मतांनी पराभव करून त्यांना धक्का दिला. याउलट काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष भरत राजपूत यांच्यावर बँक घोटाळ्याच्या आरोपाखाली ते तुरुंगात असतानाही त्यांनी प्रभाग २३ मधून निवडणूक लढवून ते विजयी झाले. मात्र त्यांचा भावाला राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. प्रभाग १ मधून ४ जागांपैकी ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या. इथे बहुजन विकास आघाडीला मतदारांनी पुन्हा झिडकारले आहे. या प्रभागात अपक्ष उमेदवार संजय पाटील आणि माकपचे यशवंत कडू आणि बहुजन विकास आघाडीचे चंद्रकांत पाटील याचा राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत बारी यांनी पराभव केला आहे. प्रभाग ६ मधून ४ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र माच्छी यांनी काँग्रेसचे धनंजय मेहेर यांचा पराभव केला आहे. या वेळच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस १५, काँग्रेस आय ५, शिवसेना २, भाजप १ असे पक्षीय बलाबल आहे. या वेळी सर्वाधिक फटका काँग्रेस आयला बसला असून, मागच्या वेळेपेक्षा त्यांच्या ६ जागा घटल्या असून, त्यातील ५ जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या तर १ भाजपकडे गेली. निवडून आलेले उमेदवार असे- राष्ट्रवादी काँग्रेस- प्रभाग १ अ) लीलावती नगीनदास देवा, ब) शिराड रमेश काकड, क) शशिकांत गंगाराम बारी, ड) रमीला मनोज पाटील. प्रभाग ३ अ) रेणुका शैलेश राकामुथा. प्रभाग ५ अ) प्रकाश गणेश माच्छी, ब) मिहिर चंद्रकांत शहा क) रेखा अतुल बारी ड) आशा अरुण पाठक. प्रभाग ६ अ) राजेंद्र लखु माच्छी, ब) प्रकाश पांडु बरक, क) कीर्ती आनंद मेहेता, ड) अलका जयदेव मेद. काँग्रेस आयचे निवडून आलेले उमेदवार असे प्रभाग २ ड) अनुराधा रमेश धोडी ड) भरतसिंग बन्सराज सिंग राजपूत; प्रभाग ३ ब) सईद अब्दुल रशीद शेख, क) मनोज रमेश धानकर, ड) रोक्साना बेहराम मझदा. शिवसेना भाजप युतीचे निवडून आलेले उमेवदार असे प्रभाग ४ अ)आरती आत्माराम ठाकूर (भाजप), ब) माधुरी महेश धोडी (शिवसेना), क) श्रावण भिकारी माच्छी, शिवसेना.