राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिक सर्वसाधारण विजेते Print

प्रतिनिधी
नाशिक
जिल्हा संघटनेच्या वतीने येथे आयोजित २३ व्या वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या पुरूष व महिलांनी सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा क्रीडा व युवा सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक रवि नाईक, नगरसेवक नाना महाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. याप्रसंगी डॉ. बलवंत सिंग, उपाध्यक्ष प्रकाश काटोळे, खजिनदार पांडुरंग रणमाळ, हे मान्यवर उपस्थित होते. प्रास्तविक अशोक दुधारे यांनी केले. आभार मधुकर देशमुख यांनी मानले. सूत्रसंचालन नंदकिशोर खैरनार यांनी केले. नाशिकच्या मुलांनी फॉइल व सॅबर या प्रकारात सांघिकमध्ये सुवर्ण तर इपीमध्ये हिंगोलीने सुवर्ण मिळविले. नाशिकच्या मुलींनी इपी व सॅबरमध्ये सुवर्ण तर फॉइलमध्ये रत्नागिरीने सुवर्ण मिळविले. पहिल्या दिवशी नाशिकतर्फे अजिंक्य दुधारे, अभय देशमुख, स्नेहल विधाते, अस्मिता दुधारे, माधुरी पाटील अनुपमा घोलप यांनी उत्कृष्ट खेळ केला. व्यक्तिगत गटात फॉइलमध्ये अजिंक्य दुधारे (नाशिक) व स्नेहल पवार (ठाणे), इपीमध्ये महेश तवर (औरंगाबाद) व स्नेहल पवार (ठाणे), सॅबरमध्ये मुस्सद्दिक चौधरी (पुणे) व निशा पुजारी (ठाणे) यांनी सुवर्ण मिळविले. व्यक्तिगत गटात नाशिकच्या आघाडीच्या स्नेहल विधातेला मात्र या स्पर्धेत इपी व सॅबर या दोन्ही प्रकारात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.