नाशिकमध्ये आज जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धा Print

प्रतिनिधी,नाशिक
येथील विद्या प्रबोधिनी प्रशाला येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता जिल्हास्तरीय सेपक टकरा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यभान सादडे यांनी दिली.
महाराष्ट्र सेपक टकरा संघटनेच्या वतीने कल्याण व ठाणे येथे १० व ११ नोव्हेंबर रोजी २३ वी वरिष्ठ गट महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. या निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सादडे, सचिव जगदीश गोल्डे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८००७२३०७७४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.