कोल्हापूर खंडपीठासाठी वकिलांचे ‘काम बंद’ आंदोलन Print

खास प्रतिनिधी, रत्नागिरी  
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पाच जिल्ह्य़ांसाठी कोल्हापूर येथे स्वतंत्र खंडपीठ व्हावे या मागणीसाठी येथील जिल्हा बार असोसिएशनतर्फे गेले तीन दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले.  सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत नागपूर, औरंगाबाद आणि गोवा येथे खंडपीठे आहेत. मात्र रत्नागिरीसह पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्य़ांसाठी स्वतंत्र खंडपीठ नसल्यामुळे येथील अनेक दिवाणी व फौजदारी प्रकरणे दीर्घ काळ प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे या जिल्ह्य़ांमधील वकील व पक्षकारांनाही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणे आर्थिकदृष्टय़ा नुकसानीचे होते. म्हणून स्वतंत्र खंडपीठाची मागणी करण्यात आली असल्याचे बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.