राज्यस्तरीय स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा व्हॉलीबॉल संघ जाहीर Print

प्रतिनिधी , नाशिक
वर्धा येथे आयोजित वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याच्या कर्णधारपदी नाशिकरोडच्या गणेश व्यायाममंदिरचा तुषार परदेशी व वीरेंद्र क्रीडा मंडळाची दीपिका पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
येथील यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर आयोजित जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेतून जिल्ह्याचे संभाव्य खेळाडू निवडण्यात आले होते. या खेळाडूंचे सराव शिबीर २५ ऑगस्ट ते पाच नोव्हेंबर या कालावधीत झाले. त्यानंतर अंतिम संघाची घोषणा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामदास होते यांनी केली.
संघ पुढीलप्रमाणे- तुषार परदेशी (कर्णधार), पुष्कर कुलकर्णी, बबलू पठाण, हेमंत पाटील, अभय ठक्कर, राहुल आव्हाड, शाहरूख शेख, अक्षय मोरे, राहुल गुणवशे, योगेश मुनोत. प्रशिक्षक- रामदास होते, सहप्रशिक्षक- मनोज म्हस्के, व्यवस्थापक- विनोद देवरे. महिलांमध्ये दीपिका पाटील (कर्णधार), स्नेहल पवार, राजश्री शिंदे, प्रणिता बस्ते, स्नेहल घुगे, उत्कर्षां सोनवणे, पूजा गडगडे, तृप्ती उत्तेकर, शिवानी बिडवे, वैशाली शहरकर, मेघा बोरकर, प्रियंका पाटील. प्रशिक्षक- आनंद खरे, सहप्रशिक्षक-अक्षय गामणे.
संघाला शुभेच्छा देण्याचा समारंभ यशवंत व्यायामशाळेच्या मैदानावर वृंदावन कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक दीपक परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी प्रशांत भाबड, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष रामदास होते, मनोज म्हस्के, राजू शिंदे, राजेश खोब्रागडे, गौरव चौधरी आदी उपस्थित होते.